उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवड करायची म्हंटल की, सध्या वाढत असलेले तापमान आणि त्यासाठी टोमॅटो ला कश्याने तरी झाकणे (क्रॉप कव्हर, शेडनेट ई.) या गोष्टींची चर्चा सर्वाधिक चालू आहे. यासाठी मी माझ्या अनुभव आणि अभ्यासातून पुढे आलेले काही टेकनिकल मुद्दे खाली मांडत आहे, नक्की विचार करावा.
पिकाला वाढलेल्या तापमाणामुळे त्रास होतोय, मिळत असलेले तापमान दोन भागात विभागता येते.
1. Air Tempreture ( हवेतील तापमान )
यामध्ये झाडाच्या जमिनीवरील सर्व भागावर पडणारे सूर्य प्रकाश किरणे यामुळे तयार झालेले तापमान याचा सहभाग होतो.
यामध्ये सूर्यकिरण पानावर पढतात, वाढलेल्या तापमानाशी डील करण्यासाठी झाडें आपल्या पानाच्या स्टोमाटा द्वारे पाणी बाहेर फेकतात, परंतु वाढत असलेल्या सूर्यप्रकाशाच्या तीव्रते मुळे हा बाशपीभावनांचा वेग प्रचंड वाढत जातो. हा वेगाला रिस्पॉन्स म्हणून झाडे मुळावाटे पाणी शोषण करतात आणि पाण्याचा बॅलन्स राखला जातो.
परंतु यासाठी मुळी कार्यक्षम असणे गरजेचे असते. असे नाही झाले तर पानातील पाणी संपत जाते, आणि झाडे कमजोर होतात, त्यामुळे नुकसान होते.
2. Soil Tempreture ( मातीचे तापमान )
यामध्ये पिकाच्या मुळातील कक्षेतील जे वातावरण आहे, त्यामध्ये माती, पाणी, मायक्रोबस या सर्व गोष्टी येतात, त्यांचे तापमान किती आहे हा भाग येतो.
मुळी 100% कार्यक्षम असण्यासाठी 22°C ते 28°C मातीचे तापमान आवश्यक असते, यापेक्षा जास्त तापमान मध्ये मुळे बंद पडते.
हे Soil tempreture वरती आपण वेगवेगळ्या उपाययोजना करून नियंत्रण मिळवू शकतो.
यासाठी माझे vedio तुम्ही पाहू शकता https://youtu.be/XYV8PPozHZM?si=2ZTb4M-iKT4b-Yr
महत्वाचे – हवेतील तापमान कितीही वाढले तरी, बाशपीभावनांचा वेग कितीही वाढला तरी, झाड त्याचं मेकॅनिझीम वापरून मुळावाटे पाण्याच्या बॅलन्स राखणार आहे, आणि त्यासाठी आपण मुळी 100% कार्यक्षम राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
टोमॅटो मध्ये नियोजन करताना नक्कीच या टेकनिकल मुद्द्याचा विचार करावा.
गणेश नाझीरकर
7020197622
फ्रुटवाला बागायतदार
Add comment